चांदेराई गावामध्ये विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत इमारत ही जुनी असून नवीन इमारतीचे काम सध्या सुरू आहे. पाणीपुरवठा सन २००० पासून सुरू असलेल्या “चांदेराई नळपाणी पुरवठा योजना” अंतर्गत नियमितपणे केला जातो. सार्वजनिक सुविधा म्हणून बाजारपेठेत पाणी उपलब्ध असून PHC (प्राथमिक आरोग्य केंद्र) आणि रस्त्यांवर १२५ पथदिव्यांची व्यवस्था आहे.
स्वच्छता राखण्यासाठी गावात ६ सीट्स असलेले सार्वजनिक शौचालय कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रात २ जिल्हा परिषद मराठी माध्यम शाळा आणि १ उर्दू शाळा आहेत, तसेच वानिपेठ अंगणवाडी आणि उर्दू अंगणवाडी देखील चालू आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र असून प्रसूतीसाठी आवश्यक सुविधा, रक्तपेढी व इतर आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. गावात “ज्ञानकुंभ वाचनालय” भाडे तत्वावर इमारतीत सुरु आहे. खेळासाठी स्वतंत्र मैदान नसले तरी युवकांसाठी खुली जागा वापरली जाते.
स्वयं-साहाय्य गट केंद्रे सध्या नाहीत, परंतु गावात बसथांबे आणि संपर्क सुविधा उत्तम आहेत. तसेच PHC मार्फत आरोग्य शिबिरे व लसीकरण मोहिमा नियमित राबविल्या जातात.








